वंचित चा रेखाताई साबळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल पिस अवॉर्ड

0

मुंबई : मिरा भाईंदर येथील महानगरपालिका सभागृह येथे भारतीय मानवाधिकार परिषद यांचा वतीने १० वा ग्लोबल पिस अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मानवाला गुलामीची जाणीव करून देणाऱ्या व परिवर्तन वादी विचारांचा महापुरुषांचा प्रतिमा पूजन करून सामूहिक संविधान प्रास्तविक वाचन करीत कार्यक्रमाला सुरुवात झाली …. .कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी हाजी शेख साहेब व राजेंद्र सिंग वालिया होते यावेळी समाजातील दुर्बल घटकातील लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार व हक्क तसेच कर्तव्य बजावत तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ २०२३अवॉर्ड सोहळा आयोजित केला होता यावेळी वंचित बहुजन आघाडी चा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई साबळे तसेच वंचित चा युवती येवला तालुका प्रमुख तसेच उपसरपंच सविता धीवर यांना भारतीय मानवाधिकार परिषदेचा वतीने मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल पिस अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले यावेळी येवला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शबनम शेख, संगीता साबळे, रंजना गाढे, वालूबाई जगताप, यांच्या सह संजय पगारे, शशिकांत जगताप, चंद्रकांत साबरे, मुक्तार तांबोळी, साहेबराव भालेराव, दयानंद जाधव, पोपट खंडागळे, प्रभाकर गरुड, यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here