
येवला : दप्तर मुक्त शनिवार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौटखेडे आज दप्तर मुक्त शनिवार या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौटखेडे मराठी येथे विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी परिसरातील उपलब्ध असणारा भाजीपाला आणि घरी बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. सदरच्या बालगोपाळांच्या बाजारात गावातील ग्रामस्थांनी वस्तू खरेदीचा आनंद घेतला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर वस्तू विक्रीचा आनंद ओसंडून वाहत होता.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारात ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. त्यांच्या व्यवहारात ज्ञान कौशल्यात भर झाली. नफा, तोटा,खरेदी विक्री यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.सदरच्या मेळाव्यास
उपसरपंच श्रीमती लिलाबाई चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्री इरफान शेख, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सबिया पठाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अल्ताफ शेख, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब पगारे, सामाजिक कार्यकर्ते श्री संजय पगारे, पोलीस पाटील इकबाल शेख तसेच गावातील ग्रामस्थ संतोष चव्हाण, रहेमान पठाण, वसीम शेख, महेश माळी, सद्दाम पठाण, शाहरुख शेख,मंदाबाई बर्डे, पुष्पा महेश माळी, मन्सूर शाहा,अजीम शेख, नदीम शेख, असलम पठाण, हमीद शेख, फिरोज पठाण, सद्दाम पटेल, साहिल पठाण, समशेरखा पठाण, ज्ञानेश्वर माळी, सुनील माळी, परवेज शेख, असलम शेख, अरशद पठाण, जमीर शेख, खलील शेख, वसीम पठाण, अल्ताफ पठाण, सतीश चव्हाण, अनिल पगारे, कलीम शेख, शब्बीर शेख, जावेद शेख, रियाज शेख, आमीन शेख, चांद शेख, शाहरुख पठाण, मुक्तार पटेल, अशपाक शाह, निसार शहा,आसिफ शहा, तोसीफ शहा, इलिया शेख, अमजद पठाण, कांतीलाल माळी, शांतीलाल माळी, गोविंद सोनवणे, राहुल सोनवणे, जिन्नात माळी, आमीन शेख, नदीम शेख, अरबाज पठाण, शहबाज पठाण, आदिल शेख, नवाज शेख, आतिफ शेख, अजहर शेख, आयान शेख, रेहान शेख, रेहान पठाण, अक्रम शेख. उपस्थित होते.या सर्वांनी चिमुकल्यांकडून वस्तू खरेदीचा आनंद घेतला. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान कौशल्य प्राप्त होण्यास हा उपक्रम स्तुत्य असल्याचे उपस्थितानी नमूद केले. सदरील उपक्रमाची प्रेरणा येवला तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री गायकवाड साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री मारवाडी साहेब, भारम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री नितीन अहिरे सर यांच्याकडून मिळाली.शाळेचे मुख्याध्यापक श्री त्रिलोकचंद काटकर सर व सहशिक्षिका श्रीमती सुप्रिया हरिश्चंद्रे मॅडम यांनी या उपक्रमाचे महत्त्व उपस्थित पालक व विद्यार्थी यांना पटवून दिले. याप्रसंगी सर्व उपस्थितानी कार्यक्रमाचे कौतुक केले.
