प्रगती पॅनल ची बहुमताकडे वाटचाल* ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड निवडणूक २३मध्ये प्रगती पॅनल ने प्रचारात आघाडी

0

मनमाड : प्रगती पॅनल ची बहुमताकडे वाटचाल ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड निवडणूक २३मध्ये प्रगती पॅनल ने प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रगती पॅनलचे उमेदवार प्रत्येक मतदारांचे व्यक्तीगतभेटीगाटी आहे तसेच प्रचार सभा,बैठका, कॉर्नर सभा आदी माध्यमातून प्रचाराची पहिली फेरी पुर्ण केली आहे,मतदारांचा कौल बघता प्रगती पॅनलचे नऊ उमेदवार प्रचंड मतांनी विजय होतील हे निश्चित आहे.ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ, ऑल इंडिया ओ बी सी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन यांची संयुक्त बैठक असोसिएशन च्या ओपन लाईन शाखा कार्यालय मध्ये संपन्न झाली या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.१८जानेवारीला पतंग हे निवडणूक चिन्ह मिळालेल्या नंतर १९जानेवारी रोजी मनमाड वर्कशॉप मध्ये टाईम बुथ जवळ जाहीर सभा संपन्न झाली.
या सभेला कामगार व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. २०जानेवारीला प्रगती पॅनल चे उमेदवार व कार्यकर्त्यांनी जागोजागी कॉर्नर बैठका घेऊन पतंग या निवडणुक चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच सायं.०५वा. सी.आर.एम.एस.कारखाना शाखा कार्यालय येथे प्रगती पॅनल च्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.२१जानेवारी प्रगती पॅनल चे उमेदवार व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रचाररॅली वर्कशॉप मध्ये काढून प्रत्यक्ष मतदाराची भेट घेऊन पतंग चिन्हांचा मत भरघोस मतांनी विजयी प्रगती पॅनल चे सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्यावर चर्चा झाली.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,सी.आर.एम.एस.चे अध्यक्ष प्रकाश बोडके, सचिव नितीन पवार,ओ.बी.सी.रेल्वे असोसिएशन कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे विजय गेडाम कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड,सी.आर.एम.एस कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल, कोषाध्यक्ष मुक्तार शेख,ओ.बी.सी.असोसिशन कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष रामधनी यादव, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, युवा अध्यक्ष वैभव कापडे, आदी प्रगती पॅनल चे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here