
मुंबई : सुराज साधना सुरेश कुटे यांनी आपल्या जन्मदिनानिम्मित (20 जानेवारी) – सुराज्या निर्माण प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची स्थापना केली. मानवी प्रकृती आरोग्यमय राहो आणि सर्वांचं आयुष्य मंगलमय हो यासाठी तुळशीचं महत्व सांगून, एकशे अकरा (111) तुळशीचे रोपटे वाटप करून, समस्त मानवजातीच्या निरोगी आयुष्याची प्रार्थना केली. ज्या प्रमाणे छोटंसं रोपटं मोठ्या झाडाचं रूप धारण करते तसच आपल्या सर्वांचा आशीर्वादाने आणि प्रेमाने समाज सेवेचं हे रोपटं सुराज्या निर्माण प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या जनकल्याणाचं कार्य निश्चितच करेल.कार्यक्रमाच्या यशस्वीतेचं श्रेय सुराज यांनी समाजसेवक शिवाजी रगडे यांना दिलं. उल्हासनगर येथे कार्यक्रम पार पडलेल्या या कार्यक्रमात, सुराज कुटे यांच्या मातोश्री साधना सुरेश कुटे, समाज सेवक शिवाजी रगडे, जयश्री रगडे, नगरसेवक गजानन शेळके, ज्येष्ठ नेते जमील खान, एकता मित्र मंडळाचे विशाल भोसले व संपुर्ण टीम तसेच शिलाताई बसोळे व पूर्ण महिला टीम, सिद्देश सावंत, गेणेश गव्हाळे, साऊल गावित उपस्थित होते.
