
नाशिक : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाशिक च्या वतीने दिनांक 20/१/२0२३ रोजी ताणतणाव मुक्ती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी उपस्थित महिला वर्गाला दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या आणि नियोजन तसेच शारीरिक मानसिक आरोग्य ताण तणावाचे व्यवस्थापण कौशल्य आणि योग याविषयी मनोधार सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष तथा धम्मगिरी योगा महाविद्यालय नाशिकच्या समनवयक गीताताई गायकवाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मनोधार सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ सुनीता भंडारी कामगार कल्याण मंडळाचे वाघ सर सौ शामली कापकर मॅडम व महिला वर्ग उपस्थित होता.
