
केरळ : माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यम परमं भाग्यं, स्वास्थ्यं सर्वार्थ साधनम्” म्हणजे “उत्तम आरोग्य लाभणे हे सर्वात मोठे भाग्य आहे” आणि “आरोग्य हा जगातील सर्व सुखे प्राप्त करण्याचा मार्ग आहे” या तत्वज्ञानावर भर देत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या, “जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाअंतर्गत, आपण सर्वांना आरोग्यसुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्यासाठी तसेच संपूर्ण जगात आरोग्य सेवांच्या उपलब्धतेतील असमानता कमी करण्याच्या उद्देशाने आराखडा तयार करण्यात मदत करण्यासाठी नियोजन करत आहोत. यावेळी नीती आयोगातील आरोग्य विषयाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल,आयुष मंत्रालयाचे सचीव राजेश कोटेचा, सचीव (आरोग्य संशोधन विभाग) डॉ. राजीव बहेल आणि अतिरिक्त सचीव (आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय) लव अगरवाल यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
