नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

विदर्भ: वर्धा जिल्ह्यातील शालोम नर्सिंग डॉ. के. बी. हेडगेवार, चेतना नर्सिंग कॉलेज, शिवाजी नर्सिंग, यांना मान्यता नसतांना संस्थाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शासनाने त्या बोगस नर्सिंग महाविद्यालयावर योग्य ती चौकशी करून कारवाई करावी व विद्यार्थ्यांचे पैसे आणि ओरिजीनल कागदपत्रे परत करुन त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भक्तराम फड यांनी केली आहे. महाराष्ट्र नर्सिंग काॅन्सिल ची कॉलेजला परवानगी नसल्यामुळे या काँलेजच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. संस्थाध्यक्ष, प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती न देता विद्यार्थ्यांकडून पैसे घेतलेले आहेत.पैशासाठी विद्यार्थ्यांना नापास करण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे क्लासेस सुध्दा घेतल्या जात नाहीत. GNMचे first year चे क्लासेस सुद्धा झालेले नाहीत. क्लासेस न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे वर्षेही वाया जाऊ शकते. या सर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. संस्थाचालक व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे पैसे व ओरीजिनल डॉक्युमेंट्स परत करावेत असे विद्यार्थीचे म्हणणे आहे.संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी या विधवा महिला, काम करून, लोन घेऊन शिकणारे व सर्व मध्यम वर्गातील असल्याने त्यांना किरायाणे रूम करून रहाणे परवडणारे नाही. तरी आपण ताबडतोब चौकशी करून, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र नर्सिंग काॅन्सिल समोर वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही यांवेळी देण्यात आला. तसेच आज ज्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली ईथुन पुढे दुसर्या कोणत्याही विद्यार्थ्यांची फसवणुक होणार नाही म्हणून महाराष्ट्रातील सर्व नर्सिंग कॉलेजची चौकशी करावी तिथे सर्व शिक्षक आहेत का, प्राध्यापक आहेत का कारण एक एका संस्थाचालकाचे तीन तीन कॉलेज आहेत त्या तीन कॉलेजचे विद्यार्थी एकाच कॉलेजमध्ये शिकवले जातात त्यामुळे महाराष्ट्र नर्सिंग काॅन्सिलने व महाराष्ट्र नर्सिंग पॅरामेडिकल स्टेट बोर्ड व राज्य शासनाने सर्व कॉलेजची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी परिचारिका संघटनेचे अध्यक्ष भक्तराम फड यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here