मनमाड : मनमाड येथील म.रा.प.मंडळ मनमाड आगार येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहनिमित्त इंधन बचत सप्ताह , तसेच नेत्र तपासणी शिबिर असे उपक्रम राबविण्यात आले . आगारातील चालक , वाहक , व कर्मचारी वर्ग यांच्या साठी इंधन बचत ह्या विषयावर माहिती आगार व्यवस्थापक श्री. प्रीतम लाड वंजारी सर व रोटरी चे ज्येष्ठ सदस्य श्री. गुरजितसिंग कांत यांनी उपस्थितांसमोर विषद केली . त्यात आगारातील चालक वाहक यांना उत्कृष्ठ कामगिरी बद्दल रोटरी तर्फे सन्मान पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले .
आगारातील चालक , वाहक , मेकॅनिक , यांच्या साठी नेत्र तपासणी शिबिर १७/०१/२०२३ रोजी राबविण्यात आले .
मालेगाव येथील रोटरी आय हॉस्पिटल येथील सर्व सुविधा आलेली अद्यावत अशी नेत्र तपासणी व्हॅन उपलब्ध करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन आगार व्यवस्थापक श्री. प्रीतम लाड वंजारी सर आणि रोटरी सदस्य श्री. आनंद काकडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले .शिबिरात नेत्र तपासणी करून आगार कर्मचारी यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले . ह्या उपक्रमात रोटरी चे ज्येष्ठ सदस्य श्री. गुरुजितसिंग कांत , श्री. आनंद लोढा , श्री. डॉ. धीरज बरडिया , श्री. कौशल शर्मा , सागर चव्हाण , सचिव श्री. डॉ.सुमित शर्मा यांच्यासह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आगार व्यवस्थापक व कर्मचारी तसेच रोटरी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गुरुजितसिंग कांत यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. डॉ. धीरज बरडिया सर यांनी केले .