अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र महिंदा येथील तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांचे कोपरे येथिल राहुल आव्हाड मित्रमंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. सौ.स्वाती राहुल आव्हाड यांनी आदिनाथ महाराज शास्त्री यांचे औक्षण केले.वडुलेखुर्द येथील संत वामनभाउ मंदिरातील पुण्यतीथी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी जात असताना महाराजांना अचानक वाटेतच अडवून सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले.कोपरे गावच्या सिमेवर टाळ पखवाजाच्या गजरात, आणि बँडपथकाच्या सुश्राव्य पथकात भाविकांनी शास्त्री महाराजांची कोपरे गावच्या सिमेपासुन तर थेट वडुले खुर्द येथील कानिफनाथ मंदिरापर्यंतच्या परिसरात सवाद्य मिरवणूक काढली.कोपरे-वडुले परिसरातील महाराजांचे अनेक चाहते भाविक भक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते.कोपरे आणि वडुले ही महाराजांची अतिशय लाडकी गावे आहेत असे खुद्द महाराजांनीच सांगितले. यावेळी कोपरे ग्रामपंचायत सदस्य सुभाषराव आव्हाड, हनुमान टाकळी सोसायटीच्या माजी व्हाईस चेरमन सौ. गयाबाई आव्हाड,डॉ. संभाजी आव्हाड,संदीप आव्हाड,पाथर्डी नगर पालीकेचे माजी नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड, संत वामनभाउ विद्यालयाचे मुख्याध्यापक,आणि वंचित आघाडीचे राज्यातील नेते प्रा.किसनराव चव्हाण, नागरे गुरुजी, जबाजी उघडे,मल्हारी आव्हाड,ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक साहेबराव आंधळे,केसभट महाराज,युवा नेते राहुल आव्हाड यांच्या सह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(प्रतिनिधी /सुनिल नजन/अहमदनगर)
Home Breaking News तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री यांचे कोपरे येथे राहुल आव्हाड मित्रमंडळाच्या...