केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ भारती प्रवीण पवार आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री, एस व्ही मुरलीधरन यांचे केरळमधील तिरुवनंतपुरम येथे पहिल्या जी 20 आरोग्य कार्यगटाच्या बैठकीला संबोधन

0

केरळ : महामारी प्रतिबंधक धोरण हा आपल्या आरोग्य धोरणाचा एक व्यवच्छेदक भाग असला पाहिजे कारण आज कोणतेही आरोग्य संकट जगाच्या परस्परांशी निगडित बहुक्षेत्रीय स्वरूपामुळे आर्थिक संकटाला कारणीभूत ठरत आहे”. असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज केरळमधील तिरुअनंतपुरम येथे जी 20 भारतीय अध्यक्षते अंतर्गत पहिल्या आरोग्य कार्यगटाच्या बैठकीला संबोधित करताना सांगितले. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एस व्ही मुरलीधरन आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल हे देखील यावेळी उपस्थित होते.
डॉ. पवार यांनी नमूद केले की महामारीचा प्रतिबंध, तयारी आणि प्रतिसाद यासाठी विविध बहु-क्षेत्रीय, बहु-संस्थात्मक समन्वयित प्रयत्नांची आवश्यकता आहे. भविष्यातील आरोग्य विषयक आणीबाणीच्या परिस्थितीत तत्पर राहण्यासाठी समुदायांना बळकट आणि सक्षम बनवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. त्या म्हणाल्या की, “कोविड 19 ही शेवटची महामारी खचितच नाही. या धड्यातून आपल्या सज्जतेचा आणि प्रतिसादाचा एकत्रितपणे अजेंडा तयार केला पाहिजे. आपण आपल्या क्षमतांमध्ये वैविध्य आणले पाहिजे आणि कोणत्याही आरोग्य संकटाचा सामना करताना आपण एकत्रितपणे स्वसंरक्षण करू हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे”.लवचिक आरोग्य प्रणाली तयार करण्याचे आणि जीवनरक्षक लसी, उपचार आणि निदानामध्ये गुंतवणूक करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.या वेळी G 20 सदस्य देशांचे प्रतिनिधी, विशेष आमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संस्था, मंच आणि जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक, जागतिक आर्थिक मंच इत्यादी भागीदार आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here