
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
राजमाता पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला द्यावे म्हणून अखंड धनगर समाजाच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची जिल्हा बैठक अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवरील हायटेक काँप्युटरच्या सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्ह्याला पुंण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव द्यावे म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीचे ठराव करून संबंधीत तालुक्यातील तहसीलदार यांना देण्यात यावे.आणि त्याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात यावी असे सर्वानुमते ठरले.जिल्हा नामांतर करण्यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामांतर दिंडी रथयात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी दिंडी रथयात्रेचे आप आपल्या तालुक्यात जोरदार पणे स्वागत करून अहिल्यादेवी होळकर नामांतराला तालुक्याच्या वतीने पाठिंबा दर्शवावा.प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी रथयात्रा दींडी नियोजनासाठी तालुक्यातील प्रमुख समन्वयकाची बैठक घेण्यात यावी. संपूर्ण जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील प्रमुख शहरातून ही नामांतर रथयात्रा जाणार आहे. आणि शेवटच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील अखंड धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी धनगर समाजातील कार्यकर्त्यांचा मोठा मोर्चा अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. त्या दिवशी जिल्ह्यातील प्रमुख माता भगिनींच्या हस्ते जिल्हाधिकारी साहेब यांना शांततेच्या मार्गाने निवेदने देण्यात येणार आहे. असे जिल्ह्यातील सर्व प्रमुख समन्वयकांनी जाहीर केले. या बैठकीस नगर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर, अकोले, संगमनेर, राहता,कोपरगाव, श्रीरामपूर या चौदा तालुक्यातील प्रमुख समन्वयक कार्यकर्ते उपस्थित होते.अहिल्यानगर जिल्हा नामांतर लढा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या दींडी रथयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन पुंण्यश्लोक अहिल्यानगर जिल्हा नामांतर समन्वय समीतीच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)
