आमदार राजळेंच्या हुरडा पार्टीत शेवगाव-पाथर्डीतील पत्रकारांच्या तक्रारीचा पाउस

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मोनिका ताई राजळे यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दोन्ही तालुक्यातील पत्रकारांना हुरडापार्टी साठी आमंत्रित केले होते. असंख्य पत्रकारांनी हजेरी लावत आपल्या गावातील समस्या आमदार राजळेंच्या कानावर घालीत तक्रारींचा अक्षरशः पाउस पाडला. काही पत्रकारांनी मतदार संघातील कामात पत्रकारांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे असा संदेश दिला. तर काहींचे म्हणणे होते की पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावी पणे करण्यासाठी आमदार राजळेंनी महाराष्ट्र विधानसभेत आवाज उठवला पाहिजे अशी मागणी केली. यावेळी उपस्थित पत्रकारांना आमदार राजळे यांनी सहभोजनासह हुरडापार्टी देऊन सर्वांना सन्मानित केले.यावेळी पत्रकार कराड,बुधवंत, नजन,देशमुख, सावंत,मंत्री यांनी आपले विचार व्यक्त केले.या प्रसंगी वजीर शेख,दिपक खोसे,रावसाहेब मरकड, शहाराम आगळे,सचिन नंनवरे,निजाम पटेल, याकुब शेख,हरीहर गर्जे, अमोल कांकरिया, नितीन गटाणी, जनार्दन बोडखे, जे.बी.वांढेकर, जयप्रकाश बागडे,नवनाथ फासाटे,शंकर मरकड, शिवदास मरकड,रावसाहेब निकाळजे,शंकरराव गुठे यांच्या सह मतदार संघातील अनेक पत्रकार उपस्थित होते.सुरेश बाबर,कानिफ पाठक,अर्जुन नेहुल यांनी चोख व्यवस्थापन केले.सर्व पत्रकारांचे राहुल राजळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here