
निफाड: निफाड येथील मल्टी मॅाडेल लॅाजीस्टीक पार्क (MMLP) ड्राय पोर्ट प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी जी व केंद्रीय मंत्री सर्वानंद सोणोवाल जी यांची नामदार डॅा. भारती पवार* यांनी दिल्ली येथे भेट घेवून नियोजित प्रकल्पस्थळाची पाहणी करण्यासाठी पाठपुरावा केला होता.मा.ना.डॅा. भारती पवार यांच्या निर्देशानुसार आज नॅशनल हायवेज लॅाजीस्टीक मॅनेजमेंट लिमिटेड नवी दिल्ली येथील CEO श्री. प्रकाशजी गौर यांनी अपर जिल्हाधिकारी श्री. पारधे साहेब, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीरकणचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, उपविभागीय अधिकारी निफाड, तहलिलदार निफाड निफाड साखर कारखान्याचे एम.डी. हांडोरे यांचेसमवेत निफाड साखर कारखान्याची जमीन व ड्राट पोर्ट प्रकल्पाची नियोजित जागेची पाहणी केली.
यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गेडसे व केंद्रीय राज्यमंत्री डॅा. भारती प्रविण पवार यांचे कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
