कोरोना इफेक्ट / लॉकडाउनदरम्यान मोठा दिलासा, 162 रुपयांनी स्वस्थ झाले विना सब्सिडी सिलेंडर; नवीन किंमत लागू

0

नवी दिल्ली. जागति महामारी कोरोना व्हायरस( कोविड-19)मुळे सध्या देशभरात लॉकडाउन सुरू आहे. यादरम्यान घरगुती गॅस (एलपीजी) वापरणाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा सरकारने दिला आहे. शुक्रवार 1 मेपासून विना सब्सिडी असलेले एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 162 रुपयांनी घट केली आहे. हे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत.

दिल्लीमध्ये 581.50 रुपयांना झाले विना सब्सिडी सिलेंडर

दिल्लीमध्ये विना सब्सिडी वाले सिलेंडर 162.50 रुपयांनी कमी झाले आहे. हे सिलेंडर आधी 744 रुपयांना होते, पण आता याची किंमत 581.50 रुपये प्रती सिलेंडर झाली आहे. मुंबईमध्ये नवीन दर 579 रुपये प्रती सिलेंडर आहे. विना सब्सिडी वाला सिलेंडर कोलकातामध्ये 584.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 569.50 रुपयांना मिळेल. सरकार घरगुता वापरणाऱ्यांना एका आर्थिक वर्षात 12 सिलेंडर सब्सिडी दरावर देते आणि यापेक्षा जास्तीची मागणी असेल, तर बाजार भावाप्रमाणे दर द्यावा लागतो. हा सलग चौथा महिना आहे, जेव्हा सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे.

कमर्शिअल गॅस सिलेंडर 256 रुपयांनी स्वस्त झाले

घरगुती गॅसशिवाय कमर्शिअल गॅसच्या किमतीतही मोठी घट झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो वाला कमर्शिअल गॅस सिलेंडरटी किंमत 1029.50 रुपये झाली आहे. तसेच, कोलकातामध्ये 1086.00 रुपये आणि मुंबईमध्ये 978 रुपये झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here