
दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज, नवी दिल्लीत विज्ञान भवन परिसरात खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे 150 प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार देखील उपस्थित होत्या.भारतीय डॉक्टरांविषयी परदेशात असलेल्या चांगल्या प्रतिमेमुळे, भारतीय वैद्यकीय शिक्षणाची ओळख अधिक ठसठशीत झाली आहे, असे डॉ भारती पवार यावेळी म्हणाल्या. “ भारताच्या विकासाची यशोगाथा, भारताविषयी विविध क्षेत्रात लोकांच्या अपेक्षा अधिकच वाढवणारी ठरली आहे. आणि त्यात, आरोग्यक्षेत्र हा एक महत्वाचा घटक आहे.” असे त्या पुढे म्हणाल्या. आपले पंतप्रधान नेहमीच असे सांगत असतात, की ‘सबका प्रयास’ या मार्गाने आपण अधिक उत्तम प्रगती करू शकतो. त्यामुळे, देशातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची भूमिका, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी महत्वाची ठरेल. आपले डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण दर्जा आणि विश्वासार्हता यांचे मूर्तिमंत स्वरूप असून आपण हा ‘इंडिया ब्रॅंड’ घेऊन दमदारपणे पुढे जायला हवे”, असे भारती पवार पुढे म्हणाल्या.
