
नांदगाव : मुस्लिम समाजातील विविध सामाजिक, शासकीय प्रश्न सोडवण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली रहेनुमा फाउंडेशन ची स्थापना केली आहे. याचे अद्ययावत सुविधा असलेले संपर्क कार्यालय कोर्ट गल्ली, नांदगाव येथे सुरू केले असून या कार्यालयाचे उद्घाटन आज सौ.अंजुम ताई सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.रहेनुमा फाउंडेशन चे कार्याध्यक्ष रियाज पठाण यांनी उपस्थितांना फाउंडेशन चे उदिष्ट समजाऊन सांगितले, सचिव अयाज शेख यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार तळागाळातील मुस्लिम कुटुंबीयांना शासकीय योजना, कागदपत्रांच्या अडचणी, सामाजिक अडचणी सोडवता याव्या या साठी या फाउंडेशन ची निर्मिती केली असल्याचे सांगितले.सौ.अंजुम ताई कांदे यांनी बोलताना उपस्थित नागरिकांना फाउंडेशन च्या माध्यमातून सामुदायिक विवाह सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत, फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अडचणी सोडवून घ्या, महिलांना ही पुढे आणा, ज्यांना मदत पाहिजे त्यांना फाउंडेशन च्या कार्यालयात घेऊन या असे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष सईद शेख, कार्याध्यक्ष रियाझ पठाण, सर चिटणीस आयाज शेख वर सदस्यांनी केले.या प्रसंगी महिला आघाडी शहराध्यक्ष रोहिणी मोरे, शहर समन्वयक भारती बागोरे, उपाध्यक्ष तबस्सुम शेख, शबाना शेख माजी नगराध्यक्षा, फरजाना मॅडम, महेजबिन निहाल शेख, नगिना पठाण, रिजवाना अयाज, शबाना अक्रम शेख, अंजुम पठाण, रुक्साना खाला,शाहीन शेख, मिनाज, मुमताज आपा, साबेरा खाला, हाजी मुनव्वर, इकबाल प्रिया, मुफ्ती फहीम, भैया चव्हान सर, खलील जनाब, हाजी युसूफ जमजम,अख्तर भाई, अय्याज कुरैशी,अल्ताफ खान, अनिस मिर्झा न्यायडोंगरी, मौलाना अकील, हाफिज मन्नान साहेब, इसहाक भाई जवलकी, सय्यद सबदर,साजिद तांबोळी, असलम तांबोळी, युनूस जनाब,रफिक मुसा,हाजी रशीद, हाजी अयुब,हाजी अब्दुल रहेमान,हाजी सरफराज,सय्यद रहेनूमा कार्यकारणी मंडळ व सदस्य, सभासद, मुस्लीम समाज समन्वय समिती सदस्य असंख्य मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
