नांदगाव मतदार संघातील नवनिर्वाचित सर्व सरपंच व सदस्यांचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडून अभिनंदन व सत्कार

0

नांदगाव ; आज आमदार निवासस्थानी आमदार सुहास आण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांनी मतदारसंघातील सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला.नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यावेळी उपस्थित होते.
मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी मी बांधील आहे गावातील अंतर्गत रस्ते भूमिकात गटारी ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी सभा मंडप आदींच ग्रामपंचायतच्या विकासातील महत्त्वाची काहीही कामे असल्यास मला हक्काने सांगा ते मी मार्गी लागेल असे यावेळी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मत व्यक्त केले.याप्रसंगी याप्रसंगी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश काका बोरसे, पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर, जिल्हाप्रमुख किरण देवरे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, योगेश (बबलू) पाटील, बाळासाहेब कवडे, डॉक्टर संजय सांगळे, किशोर लहाने, प्रमोद भाबड, आनंद कासलीवाल, राजेंद्र देशमुख, धनंजय (बाळू आप्पा) कांदे, ज्ञानेश्वर कांदे, संजय आहेर, अमोल नावंदर, अंकुश कातकडे,शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीता ताई बागुल, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे, अनिल तात्या रिंडे, संग्राम नाना बच्छाव, दत्तू भाऊ निकम अशोक शेवाळे, सुधीर देशमुख राजाभाऊ सांगळे, दसरथ लाहिरे, एन के राठोड, पंकज जाधव पिंटू भाऊ वडघर, आबा नाईकवाडे, विठ्ठल पगार, भागचंद तेजा, शहर प्रमुख सुनील जाधव, युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, भाऊराव बागुल, अण्णा मुंढे, आदि सह मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आहेर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here