
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ.अरूण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्राचार्य अरुण पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. प्रमुख वक्ते प्रा. अमर ठोंबरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप धमाले यांनी केले.
