
नाशिक : वडनेर भैरव येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भैरवनाथांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला. तसेच समस्त ग्रामस्थ बांधवांशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधला.केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या बाबतीत आढावा घेऊन शेतकऱ्यांना द्राक्ष संदर्भात येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली.
यावेळी सरपंच सुनील पाचोरकर, बाळासाहेब माळी, योगेश साळुंखे, संजय पाचोरकर, बाबाजी सलादे, डॉ परदेशी, ऍड. शांताराम भवर, अनिल कोठुळे, नाना सलादे, रावसाहेब भालेराव,माधवराव शिंदे आदींसह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
