मीरीच्या पुजा नंन्नवरेची पुणे मनपात कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाल्याने नगर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
पुणे महानगर पालिकेच्या वतीने वर्ग क्र.दोनच्या कनिष्ठ अभियंता या पदासाठी पुण्यातील विविध केंद्रावर हजारो विद्यार्थ्यांची परिक्षा घेन्यात आली होती. या परीक्षेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी येथील रहिवासी कु.पुजा भाउसाहेब नंन्नवरे या विद्यार्थ्यिनीने ही परीक्षा दिली होती.मीरी सारख्या अतिशय दुष्काळी भागात आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही पुजाने आपले शिक्षण पूर्ण केले होते. आई वडिलांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन यामुळेच मी हे यश संपादन करू शकले आता भविष्यात या पदावर लोकसेवक म्हणून काम करताना प्रथम सर्व सामांन्य लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्या साठीच मी प्रयत्न करणार असल्याचे कु. पुजा हिने सांगितले.पुण्यातील उद्दोजक शैलेश नंन्नवरे आणि मीरी कार्यकारी सोसायटीचे माजी व्हाइस चेरमन ज्ञानदेव नंन्नवरे यांच्या त्या भगिनी आहेत. पुणे मनपात बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाल्याने अहमदनगर जिल्ह्याचे माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे यांचे खंदे समर्थक राजूमामा तागड,मीरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच संतोष शिंदे,राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय आमदार प्राजक्त दादा तनपुरे, राहुरीच्या नगरपालिकेच्या मा. नगराध्यक्षा सौ.उषाताई तनपुरे,केदारेश्वर साखर कारखान्याचे चेरमन प्रतापराव ढाकणे,मीरीच्या राजयोग मंगल कार्यालयाचे संचालक विजयराव कोरडे,सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे,महादेव कुटे, विरभद्र देवस्थानचे सेवक सिताराम भगत,आसाराम भगत,जबाजी निर्मळ,अशोकराव सोलाट, चंद्रकांत सोलाट यांनी कु.पुजा हीचे अभिनंदन केले आहे.(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here