
मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय विभागीय शिकाई मार्शल आर्टस् स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु. भुमिका चित्रकार (४० कि.ग्र.), कु. गायत्री कदम (४२ कि.ग्र.), कु. जयेश शिंपी (४५कि.ग्र.) आणि कु. पवन लाहोट (४९कि.ग्र.), या खेळाडूंनी विजय संपादन करून सुवर्ण पदक प्राप्त केले. मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील, कुलसचिव श्री समाधान केदारे, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे, पर्यवेक्षक विठ्ठल फंड,क्रीडा संचालक प्रा. संतोष जाधव,क्रीडा शिक्षक महेंद्र वानखेडे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विजय खेळाडूंचे अभिनंदन केले.
