सन १९७३ सालातील गुजरात मधून पळालेला फरारी खुनी,रांजणीच्या सिताराम भतानेच्या पाथर्डी पोलिसांनी मुसक्या आवळल्या

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) सन एकोणीसशे बहात्तर सालाच्या भिषण दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये स्थलांतरित झाली होती.त्या पैकीच
सन १९७३ साली गुजरात राज्यातील आमदाबादच्या फैजपूर शहरातील धनुसह्याद्री सोसायटीच्या ईमारतीत भिषण घटना घडली. ईमारत मालकिन मणिबेन शुक्ला (वय ७०)या सोसायटीच्या रुममध्ये ग्राहकांना भाडोत्री खोल्या देऊन रहात होत्या. त्याच सोसायटीच्या एका रुममध्ये सिताराम तात्याबा भताने (वय वर्षे२३) रा.रांजणी ता.पाथर्डी, जिल्हा,अहमदनगर हा भाडोत्री खोली घेऊन रहात होता.एके दिवशी तो रात्रीच्या अंधारात चोरीच्या उद्देशाने मणिबेन शुक्ला यांच्या घरात शिरला. चोरी करून बाहेर पडताना त्याला मणिबेन शुक्ला यांनी रंगेहाथ पकडले.त्याचवेळेस झालेल्या झटापटीत मणिबेन शुक्ला यांच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार झाल्यामुळे त्या जागेवर म्रुत्यु पावल्या. मग सिताराम भताने याने सदर घरातील सर्व ऐवज चोरून नेले व घराला बाहेरून कुलूप लावून पळून गेला.तीन चार दिवसांनी घरातील कुजलेल्या प्रेताची दुर्गंधी सर्वत्र पसरल्याने लोकांनी पोलिसांना सांगितले. सरदार नगर पोलिसांनी घर उघडून मणिबेन शुक्ला यांच्या घराचा पंचनामा करत प्रेत उत्तरिय तपासणी साठी सरकारी दवाखान्यात पाठवून दिले. सरदार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४५८/१९७३ कलम३०२,३८२ प्रमाणे मणिबेन शुक्ला यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सन १९७३ सालात धनुसह्याद्री सोसायटीच्या ईमारतीत राहणारा ईसम सिताराम तात्याबा भताने हा मात्र मणिबेन शुक्ला यांचा खुन झाल्यापासून फरार झाला होता. तेविस वर्षिय सिताराम भतानेला सरदार नगर पोलिसांनी जंग जंग पछाडले पण तो कोठेही सापडला नाही. मोठी चोरी पचवल्या नंतर त्याने लहान मुलांच्या अंगावरील दागिने ओरबाडत बलत्काराचाही गुन्हा केला होता. दि.१४ आँगष्ट सन २०१३ रोजी सिताराम भतानेच्या नावाने अटक वारंटही निघाले होते पण तो पोलिसांना काही सापडला नाही.सन २०२२ च्या नोव्हेंबर मध्ये सरदार नगर पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक पी.व्हि.गोयील यांनी पदभार हाती घेतला. मागील गुन्ह्याची उकल करीत असताना त्यांना मणिबेन शुक्ला यांच्या खुनाची फाईल सापडली.आणि त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.प्रथम त्यांनी आँनलाईन पद्धतीने तपास केला. सिताराम तात्याबा भतानेच्या नावाने भारतात कोठे आधार कार्ड नोंदणी झाले आहे का ते तपासून पाहिले असता त्यांना महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील रांजणी या गावात सिताराम तात्याबा भताने हा इसम रहात असल्याचे पोलिसांना आढळून आले.पोलीस निरीक्षक पी.
व्ही.गोयील यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राँकेश ओला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. त्यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या सहकार्याने एक पथक तयार केले. त्या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील,पो.काँ. रामदास सोनवणे,निलेश म्हस्के, अतुल शेळके,भारत आंगरखे या पोलिसांचा समावेश होता.या पथकातील पोलिसांनी अगोदरच खबऱ्या मार्फत सिताराम भतानेची चौकशी केली असता तो गावातील मंदिराकडे येत आहे अशी माहिती मिळाली.मग तपासणी पथकातील पोलिसांनी सिताराम भतानेला ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात आणले आणि गुजरात पोलिसांना कळवून त्यांच्या ताब्यात दिले. गुजरात पोलिसांनी सिताराम भतानेला अटक केली तेव्हा तुम्ही मला शोधले कसे?आणि त्या मणिबेन शुक्ला यांच्या खुनाची घटना मला आता अजिबात आठवत सुद्धा नाही असे सांगितले.सन१९७३साली झालेल्या खुनाचा तपास आरोपीच्या वयाच्या ७३व्या वर्षी लागला हा एक योगायोग म्हणावा लागेल.आरोपी भताने हा रांजणी गावात वारकऱ्यांच्या रुपात वेशांतर करून रहात होता. या प्रकरणात “कानुन के हात, बहोत लंबे होते है” याची प्रचिती आली.” या प्रसंगी लावणी तील चार ओळी आठवतात त्या अशा “अशी घामाघूम का झाली आज ही जनता सारी,मान घालुन खाली काहो फिरला गुजरातला माघारी, कसा घायाळ झाला शिकारी, कसा घायाळ झाला फरारी”. खुन कधीच पचत नसतो,एक दिवस निश्चितच खुनाला वाचा फुटते हे आपले पुर्वज सांगत होते ते आज खरे झाले आहे.त्याची प्रचिती या प्रकरणात सिद्ध झाली. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा, स्पेशल क्राईम रिपोर्टर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here