रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा

0

पुणे : जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे, दि.१७ डिसेंबर :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे खासदर डॉ.श्रीकांतजी शिंदे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री.मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय हाॅस्पिटलचे डेप्युटी डायरेक्टर श्री.जितेद्र ओसवाल आणि मार्केटिंग मॅनेजर श्री.मानसिंग चव्हाण तसेच डॉ.शशिकांत जाधव (पब्लिक रिलेशन ऑफिसर) यांना आरोग्य सेवेत केलेल्या उल्लेखनीय कामाची पावती म्हणून या सत्कारमुर्तींना मा.मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचं कृतज्ञता पत्र,वैद्यकीय मदत मार्गदर्शक पुस्तिका, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या 5 व्या वर्धापन दिनाच्या निमित्त काढलेला अहवाल…शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रचार, प्रसार, प्रसिद्धी आणि संघटन समन्वयक व शिवसेना पुणे उपशहर प्रमुख श्री.राजाभाऊ भिलारे यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here