
मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: मुंबईतील कांदिवली येथील शिवसेना, मनसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच शिवसेनेच्या भारतीय चित्रपट कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुशांत शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शनिवारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला,
त्यासोबतच कांदिवली विभागातील महिला विभाग संघटक विशाखा मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस मनिषा गांगण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रोहन राणे, मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.या सर्वांचे पक्षात मनापासून स्वागत करित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची भूमिका विशद करताना कांदिवली परिसराला भेडसावणारे प्रश्न नक्की सोडवण्यात येतील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, महिला विभाग संघटक सौ.कला शिंदे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्या आशा मामिडी तसेच पदाधिकारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
