कौण बनेगा लोकनियुक्त सरपंच” तिसगाव-वाघोली-कोरडगावात पैजा

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात अतिशय चुरशीच्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडनुकीत “कौण बनेगा लोकनियुक्त सरपंच” याचीच चर्चा जिल्हा भर सुरू आहे. शेवगाव-पाथर्डी-राहुरी तालुक्याच्या राजकारणाचा केंद्र बींदू ठरणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका १८ डिसेंबर २०२२ रोजी होत आहेत.त्यापैकी शेवगाव तालुक्यातील वाघोली आणि पाथर्डी तालुक्यातील तिसगाव-कोरडगाव या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. वाघोली ग्रामपंचायत निवडनुकित जनतेतून सरपंच पदासाठी सत्ताधारी वाघेश्वरी ग्रामविकास पँनल कडून “नारळ” या चिन्हावर सौ.सुस्मिता उमेश भालसिंग विरुद्ध ज्ञानेश्वर ग्रामविकास पँनल कडून “एस्टी बस”या चिन्हावर सौ.निर्मला प्रकाश वांढेकर या एकमेकींच्या विरोधात निवडणुक मैदानात दंड थोपटून उभ्या राहिल्या आहेत.सामांन्य कार्यकर्ता विरुद्ध साखर सम्राट, शिक्षण महर्षि अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. तिसगाव ग्रामपंचायत निवडनुकित सत्ता धारी आदर्श ग्रामविकास मंडळा कडून “कपबशी” या चिन्हावर सौ.भागुबाई भाउसाहेब लोखंडे विरुद्ध जनसेवा मंडळाच्या “नारळ” या चिन्हावर सौ मुनिफा ईलियास शेख या निवडणूक लढवित आहेत.गेली चाळीस वर्षे झाली तरी एकहातीच सत्ता स्थापन करण्यात येत होती हा ईतिहास आहे. पण सामांन्य माणसे बाजूला गेल्या मुळे ही निवडणूक होत आहे.कोरडगाव ग्रामपंचायत निवडनुकित सत्ताधारी जनसेवा मंडळाकडून “कपबशी”या चिन्हावर सौ.साखराबाई नामदेव म्हस्के यांच्या विरोधात माजी सरपंच भगवानराव घुगरे यांच्या सुकन्या कुमारी पद्मावती भगवानराव घुगरे या “हेलिकॉप्टर”या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत.एक सुशिक्षित दिव्यांग मुलगी ही जनतेतून सरपंच होण्याचा मान मिळवण्यासाठी निवडणूक लढवित आहे.हा एक नवतरुणी साठी वेगळा आदर्श निर्माण करणारा संदेश आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत “कौण बनेगा लोकनियुक्त सरपंच” याकडे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.घोडा मैदान जवळ असल्याने विजयासाठी अनेक ठिकाणी पैजा लागल्या आहेत. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here