
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श गाव म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायत निवडनुकीत युवा नेते उमेश भालसिंग यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी मंडळाच्या वतीने वाघेश्वरी ग्रामविकास पँनल आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले- सौ.हर्षदाताई काकडे गटाच्या वतीने ज्ञानेश्वर ग्रामविकास पँनल यांच्या मध्ये जोरदार लढत होत आहे.दोन्ही पँनलच्या वतीने गावातील जोडीचे मारुती,माता वाघेश्वरी,महालक्ष्मी, विठ्ठलरुक्मिणी,वै. यादवबाबा यांच्या मंदिरात जाऊन निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.वेदशास्त्रसंपन्न भटजी विष्णूपंत भालेराव यांच्या मंत्रोच्चारात आणि ह.भ.प.तुकाराम महाराज केसभट,व पवार महाराज यांच्या हस्ते माता वाघेश्वरी आणि मारुती मंदिरात जाउन महापुजा करण्यात आली.सत्ताधारी वाघेश्वरी पँनलच्या वतीने वार्ड क्र.एक मधून राजेंद्र अशोक जमधडे,नलाबाई कार्लस आल्हाट,निर्मला गोरक्षनाथ दातीर, वार्ड क्र.दोन मधून सुखदेव नाथा शेळके,हिराबाई रावसाहेब शिंगटे,कल्पना पांडुरंग भालसिंग, वार्ड क्र.तिन मधून मोहन बाबुराव गवळी, घनश्याम निव्रुत्ती वांढेकर, कांताबाई बबन बोरुडे हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तर विरोधी ज्ञानेश्वर ग्रामविकास पँनल कडून वार्ड क्र.एक मधून अशोक केशव जमधडे, मिराबाई सुधाकर आल्हाट, राधा संतोष दातीर, वार्ड क्र.दोन मधून हरिभाऊ काशिनाथ शेळके, विमल गोरक्षनाथ शिंदे,पायल अमोल भालसिंग, वार्ड क्र.तिन मधून राजेंद्र रामचंद्र शिरसाठ,आबासाहेब उर्फ गणेश शेषराव भालसिंग, दिपमाला मोतीराम काळे या निवडणूक लढवित आहेत.आणि अतिशय चुरशीच्या होणाऱ्या जनतेतून सरपंच पदाच्या लढतीत सरपंच पदासाठी सत्ताधारी वाघेश्वरी पँनल कडुन युवा नेते उमेशराव भालसिंग यांच्या पत्नी सौ. सुस्मिता उमेश भालसिंग या नारळ या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत तर विरोधी ज्ञानेश्वर पँनल कडून सौ.निर्मला प्रकाश वांढेकर या एस्टी बस याचिन्हावर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.या निवडणुकीत एकूण सोळा महिला उमेदवार निवडनुक लढवित आहेत परंतु निवडणूक प्रचाराच्या शुभारंभा प्रसंगी दोन्ही गटातील एकही महिला उपस्थित नव्हती ही अतिशय खेदाची बाब म्हणावी लागेल. वाघोली ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील अतिशय अग्रगंण्य म्हणून संबोधली जाणारी ग्रामपंचायत आहे.सत्ताधारी वाघेश्वरी पँनलचे निवडणूक चिन्ह कपबशी, गँसटाकी,छत्री तर विरोधी ज्ञानेश्वर पँनलचे निवडणूक चिन्ह रोड रोलर,स्टुल,छताचा पंखा हे आहे. ही निवडणूक जरी ग्रामपंचायतीची असली तरी नांदी मात्र जिल्हा परिषदेच्या आगामी निवडनुकीची सुरू झाली आहे.आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अती उत्साही कार्यकर्त्यांनी पैजा ही लावल्या आहेत. गावातील गाव पुढाऱ्यांचे आपल्या नेत्याकडे किती वजन आहे हे या निवडनुकीच्या निमित्ताने दिसून येणार आहे.संपूर्ण शेवगाव तालुक्याचे या निवडनुकीकडे लक्ष लागले आहे
.
(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर).
