वंचित बहुजन आघाडीचे शशिकांत जगताप समाजरत्न २०२२ पुरस्काराने सन्मानित

0

पुणे : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधत ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार सोहळा २०२२ आयोजित करण्यात आला होता यावेळी सामाजिक कार्यकर्ते व सरपंच शशिकांत जगताप यांना समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले ,कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्री खोब्रागडे साहेब,तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त माजी न्यायाधीश सी.एम चोधते,मराठी चित्रपट अभिनेते अनंत जोग ,सकाळ समूहाचे संस्थापक संदीप काळे,पोलिस निरीक्षक सुप्रिया पंढरपूर हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन यशदा संशोधन अधिकारी बबन जोगदंड तर स्वागताध्यक्ष ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गहिनीनाथ बनसोडे हे होते,या पुरस्कार सोहळ्या अंतर्गत येवला तालुका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते शशिकांत जगताप यांनी.सामाजिक बांधिलकी जपत तसेच सामाजिक कार्यात सहभागी होत,वंचित ,गरजू घटकातील लोकांना मदत तसेच तालुक्यातील व गावातील नागरिकांचा समस्या घेऊन पाणी प्रश्न,रेशन घोटाळा तसेच घरकुल योजनेचा लाभ ग्रामपंचायतीकडून प्रामुख्याने मिळवून देण्यासाठी कायम संघर्ष करत आहे,दरम्यान शशिकांत जगताप यांनी आंबेडकर चळवळीचा विचाराची शिदोरी घेऊन सर्वसामान्यांचा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रेरणादायी वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा श्रद्धेय आदरणीय अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश करून पक्षानेही सरपंच शशिकांत जगताप यांच्या कार्याची माहिती व दखल घेत शशिकांत जगताप यांना येवला तालुका वंचित आघाडी प्रसिद्धीप्रमुख ही जबाबदारी दिली समाजसेवेसाठी तत्पर , आवाज उठविणारा युवा चेहरा अशी ओळख शशिकांत जगताप यांची झाली आहे,येवल्यातील शशिकांत जगताप यांच्या कार्याची दखल पुण्यातील ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनने घेतल्याने गावासह तालुक्यात कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत ,हा समाज रत्न पुरस्कार आपल्याला प्रेरणा देणारा आहे अशी भावना शशिकांत जगताप यांनी केली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here