मार्शल आर्ट कार्यालयाचे मोठ्या थाटात उदघाटन

0

मुंबई-अंधेरी (प्रतिनिधी-राजेंद्र लकेश्री)
ऑल मार्शल आर्ट्स सेल्फ डिफेन्स फेडरेशन कार्यालयाचे उदघाटन शिवसेनेच्या आमदार श्रीमती ऋतुजा लटके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र लकेश्री हे होते. अंधेरी येथील बी.एम.सी. मार्केट, नागरदास रोड (पूर्व) येथे व्यक्त्तीगत ग्रूप फिटनेस ट्रेनींग सेंटर साठी फेडरेशन अध्यक्ष श्री. बी.के.पवार निवृत्त पोलीस अधिकारी यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून सुरू झाले आहे. जागतिक किर्तीचे श्री.पवार यांनी मार्शल आर्ट्स, बॉडी गार्ड, कमाड़ो इत्यादींसाठी २१ वेळा परदेशी गेले तर १९९५ मध्ये फाईट मध्ये पहिले सुवर्णपदक पटकावले शाळा, महाविद्यालय कॉलेज पोलीस, होमगार्डसह ग्रूपस मधील युवा पिढीतील हजारोंना गेली ४३ वर्ष त्यांना आत्मसंरक्षण साठी ज्युडो कराटेचे शिक्षण दिले, पोलीस खात्यातून नुकतेच निवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ या सेवेसाठी वाहून घेण्याचे ठरविले आणि त्यानूसार फेडरेशनसाठी कार्यालय उभारले. सदर कार्यालयाच्या उदघटनांसाठी अंधेरी येथील मुक्त्ती धामचे सरचिटणीस श्री. शंभूगिरी गोस्वामी, अँड.दिपरत्नाकर सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती. सुन्नेता नटे, संजय सुर्वे, धनंजय कोरगावकर, हेमंत अनुमाला, बाबा पप्पूसर इत्यादि मान्यवरांचे उपस्थितांचे आभार श्री. धिरज पवार सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here