
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन. रामभक्त आणि देशभक असलेल्या या महान सुपुत्राला भारत देश मुकला, तो आजचा देशासाठी वाईभारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन.ट दिवस.6 डिसेंम्बर.डॉ. बाबासाहेब नाशिकच्या राम मंदिरात राम दर्शनासाठी गेले, परंतु त्या वेळच्या बुरसटलेल्या मंदिराच्या पूजार्यांनी त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला, तेंव्हा मी राम दर्शन घेतल्या शिवाय राहणार नाही, अशी घोषणा बाबासाहेबांनी केली, आणि मंदिराच्या आवारात आंदोलन केले, तरीही उपयोग होत नाही, असे पाहुन बाबासाहेबांनी मंदिरात बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला..परंतु त्या झटापटीत बाबासाहेब आंबेडकर जखमी झाले, त्यामुळे संतापून त्यांनी रागाच्या भरात घोषणा केली
“मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही” देशासाठी ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल.भारत आणि पाकिस्तान या फाळणीला बाबासाहेबांनी कडाडून विरोध केला, परंतु ते त्यावेळी एकाकी पडले, ही सुध्दा देशासाठी दुर्दैवी घटना.फाळणी करायची असेल तर, हिंदू- मुस्लिम यांचे स्थलांतर करा असेही बाबासाहेब यांचे मत होते.खरे तर बाबासाहेब यांचे जिवन एक ‘खडतर’प्रवास होता असे म्हणावे लागेल.शालेय जीवनात असतांनाच लग्न झाले, त्यांच्या आयुष्यात त्यांच्या इतकीच महान विचारसरणी असलेल्या रमाबाई आंबेडकर यांच्याशी विवाहानंतर बाबासाहेब यांना उच्च शिक्षणासाठी ब्रिटन आणि कोलंबिया येथे जावे लागले, दरम्यानच्या काळात त्यांच्या मुलाचा मृत्यु झाला, बाबासाहेब आंबेडकर परदेशात… आणि असे संकट. काय आणि किती यातना झाल्या असतील? माता रमाबाई यांना, पण त्यांनी हे दुःख एकाकी पेलले परंतु बाबासाहेब साहेब यांच्या शिक्षणात त्यांनी बाधा येऊ दिली नाही.आणि म्हणूनच त्यांच्या या खडतर त्यागा मुळे भिमराव आंबेडकर हे
बाबासाहेब आंबेडकर झाले, असे म्हणावे लागेल.अशा या महान रामभक्त आणि देशभक्त बाबासाहेब यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन.💐 सुभाष पहिलवान, पाटोळे.
