मनपा शाळा क्र.७१ मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

0

नाशिक :सिडकोच्या हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सुरुवातीस शालेय परिसरातून ढोलताशांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी शाळेने प्रभातफेरी च्या माध्यमातून भारताच्या राष्ट्रीय प्रतिकांचे फलक विद्यार्थ्यांच्या हातात देत राष्ट्रीय प्रतिकांची आगळीवेगळी ओळख करुन देण्यात आली. प्रभातफेरीत विद्यार्थ्यांनी संविधान दिनाचा-विजय असो, भारत माता की जय, माझे संविधान-माझा अभिमान, संविधान आमचे छान – भारत देशाची शान इ. घोषणा देत परिसर दणाणून सोडला. प्रभातफेरी शालेय मैदानावर येताच प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते संविधानाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी संविधानाचे महत्व समजावून सांगितले.
तद्नंतर सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी संविधान उद्देशिकेचे तोंडपाठ सामूहिक वाचन केले.
संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध भाषिक व विविध धर्मियांच्या वेशभूषा करत भारतीय संविधाचे “विविधतेतील एकता” हे वैशिष्ट्य अधोरेखीत केले.शेवटी इ.६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांची संविधानावर आधारीत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे नियोजन शिक्षिका प्रमिला देवरे, शोभा मगर व किर्तीमाला भोळे यांनी केले. संविधान दिनाचे नियोजन प्र. मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ शिक्षक किसन काळे, विनोद मेणे प्रमिला देवरे, वर्षा सुंठवाल, शोभा मगर, कविता वडघुले, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, किर्तीमाला भोळे, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, प्रविण गायकवाड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here