
नाशिक : सिडकोच्या हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांस विनम्र अभिवादन करण्यात आले.परित्राण कांबळे, कृष्णा चव्हाण हे विद्यार्थी म. ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी तेजश्री दाणेज,कनिका परदेशी,आरोही धबाले, देवयानी सोनवणे,प्रज्ञेश बकरे, रीया कुंभार,सानिया सोनवणे,वेदिका महिरे, प्राप्ती कुऱ्हे, चंचल ठाकूर,तन्मय डंबाळे, साईराज कुऱ्हे, खुशबूकुमारी शर्मा, शालोम कोल्लूर, प्राजक्ता काळकर,सचिन दुधेकर,निशा पवार, श्रध्दा इंगळे, वैष्णवी गायकवाड या इ.१ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतून भाषणे केली. तसेच जेष्ठ शिक्षक किसन काळे व वर्षा सुंठवाल यांनी म.फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी महापुरुषांचे सद्गुण आचरणात आणण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे नियोजन इ. ४ थी च्या वर्गशिक्षिका वर्षा सुंठवाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसन काळे, विनोद मेणे, शोभा मगर, कविता वडघुले, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, , किर्तीमाला भोळे, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत यांनी परीश्रम घेतले.
