महात्मा फुले हे आदर्श शिक्षक – महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे.

0

मनमाड :  दिनांक 28/11/2022 सोमवार रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन करण्यात आले.त्याप्रसंगी महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी वरील विधान केले त्यांनी सतिप्रथा बंद केली स्त्रियांना शिक्षण मिळणेसाठी शाळा सुरू केल्या आपल्या स्वताच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवून स्री शिक्षणाचा पाया रचला समाजासाठी त्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे.याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश नेते अनिलभाई गांगुर्डे, ज्येष्ठ नेते वसंतराव कांबळे,रेखाताई सुरवडकर,कविताताई कर्डक,सनाताई सय्यद,सोनू कागडा,सनीभाऊ काळे,एम.कांबळे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here