
नाशिक : महान स्वातंत्र्यसैनिक, जननायक, महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा जी यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमात मा. राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी , माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ ,आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित ,पालकमंत्री दादा भुसे, यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बोरसे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सिमाताई हिरे, मंजुळा ताई गावित, रंजना ताई भानसी,आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड तसेच अधिकारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.
