
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कोहिमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पीएचसीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता ग्रामिण व शहरी भागात घरोघरी सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविकां सोबत त्यांना आरोग्य सेवा पुरवताना येणाऱ्या समस्यांबद्दल संवाद साधला. प्रधानमंत्री जन औषधी केंद्राला देखील भेट दिली. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नागालँड दौऱ्यात कोहिमा सरकारी रुग्णालयाला भेट दिली.माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवा सुनिश्चित केल्या जात आहेत.
