
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नागालँडच्या भेटीदरम्यान किफिरे जिल्ह्याचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेऊन जिल्हा रुग्णालयातील सुविधांचे उद्घाटन केले. किफिरे हा आकांक्षी जिल्हा असून तसेच आरोग्यासह इतर सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने काम करण्याचे निर्देश दिले यावेळी प्रधान सचिव आरोग्य सेवा,अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान,आयुक्त, जिल्हाधिकारी, व इतर आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
