जागतिक पॅथॉलॉजी दिना निमीत्त श्री अनिल बिडकर यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नांदेड: दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागतिक पॅथॉलॉजी दिवस साजरा केला जातो. हा दिवस आपल्या समाजातील डॉक्टर्स तसेच सर्वसामान्य माणसांना पॅथॉलॉजी विषया बद्दल माहिती आणि जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. पॅथॉलॉजी ही एक मॉडर्न मेडिसिन ची स्पेशालिटी आहे ज्यामध्ये आपण रोगांचे निदान करण्यासोबतच त्याच्या मूळ कारणाशी पोहोचू शकतो. पॅथॉलॉजी शास्त्रामध्ये जे डॉक्टर पदव्युत्तर शिक्षण घेतात त्यांना पॅथॉलॉजिस्ट म्हणतात. पॅथॉलॉजिस्ट बनण्यासाठी एमबीबीएस नंतर तीन ते पाच वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घ्यावे लागते. पॅथॉलॉजिस्ट हे आपल्या शरीरातील रक्त, लघवी ,मल ,थुंकी, कोषांचे द्रव्य आणि गाठींची तपासणी करून रोगनिदान करतात. पॅथॉलॉजी लॅब मध्ये जरी आपल्याला मोठे मोठे मशीन दिसत असले आणि असा समज असला की नमुना मशीन मध्ये घातला की रिपोर्ट तयार होतात तर असं नसून लॅबोरेटरी मॅनेजमेंट ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. त्याला उत्तम दर्जाच्या मशीन ,टेस्ट टाकायला क्वालिफायड तंत्रज्ञ (टेक्निशियन), मशीन मधून येणारा निकाल अचूक आहे की नाही हे प्रमाणित करायला व नमुने मायक्रोस्कोप खाली तपासून निकाल द्यायला पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर लागतो. तसेच पॅथॉलॉजिस्ट रोज उत्तम दर्जेचेच रिपोर्ट प्रमाणित व्हावे यासाठी इंटरनल आणि एक्स्टर्नल कॉलिटी कंट्रोल चे मापदंड ठरवून काटेकोरपणे ते पाळतात.कुठलीही तपासणी करताना पुढील गोष्टींकडे लक्ष द्या ः१.त्या लॅब चे क्वालिटीचे काय मानांकन आहे ते तपासा २. तिथे एमबीबीएस नंतर पॅथॉलॉजी मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉक्टर आहे ना हे तपासा ३.त्या डॉक्टरांना भेटून तुम्ही आपले रिपोर्ट समजावून घ्या व त्यांचे मार्गदर्शन घ्या. सजग व्हा आणि निरोगी रहा !! आनिल जायभाये बीडकर
भारतीय परिचारिका परिषद संस्थापक अध्यक्ष,
महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन संघटन राज्यकार्याध्यक्ष, शहिद भगतसिंग ब्रिगेड महाराष्ट्र संघटक,रूग्ण हक्क परिषद सदस्य,
समाजसेवक आरोग्य सेवा,नर्सिंग ऑफिसर( GNM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here