
नाशिक : नाशिक जिल्हयातील दिंडोरी इथल्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुल आणि अंडरपास म्हणजेच त्या खालून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला तत्वत: मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी ११५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी ही माहिती दिली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नाशिक विभागाची बैठक काल झाली. या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची डॉ. भारती पवार यांनी दिल्ली इथं भेट घेतली होती.
