
मनमाड: दि.१०. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत पुणे जिल्हा हा संघ विजयाचा मानकरी ठरला. द्वितीय क्रमांक अहमदनगर जिल्हा व, तृतीय क्रमांक पुणे शहरी विभाग तर चतुर्थ क्रमांक नाशिक कबड्डी संघाने मिळवला. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ सहाय्यक संचालक डॉ दत्ता महाधम, प्राचार्य अरुण पाटील, निवड समिती अध्यक्ष दत्ता शिंपी, निवड समिती सदस्य प्रा कॅप्टन रावसाहेब गरड, प्रा. शांताराम ढमाले, शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ सुरेखा तप्तरे, डॉ दिनेश कराड, स्पर्धा संयोजन सचिव प्रा संतोष जाधव, प्रा, महेंद्र वानखेडे, श्री प्रशांत सानप, पवनसिंग परदेशी,लेफ्टनंट प्रकाश बर्डे, श्री रोहन बागुल, राष्ट्रीय पंच श्री सतीश सूर्यवंशी व पंच उपस्थित होते.
