वडुले खुर्द च्या जिजाऊ उद्यानात जिल्ह्यातील “भुमिपुत्रांचा सन्मान पुरस्कार” वितरण सोहळा संपन्न

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
आयुष्यभर इमाने इतबारे सेवा करीत आपले आयुष्य खर्ची घातलेल्या आणि जिवनाच्या सुर्यास्ता कडे झुकलेल्या भुमिपुत्रांना आयुष्याच्या उत्तरार्धात पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्याची आदर्श किमया अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील जिजाऊ उद्यानात पार पडली. कानिफनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संत वामनभाउ विद्यालयाच्या जिजाऊ उद्यानात जिल्ह्यातील भुमिपुत्रांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. गावातील पाचोरा येथे सेवेत असलेले शिक्षक बाळासाहेब संतराम आव्हाड सर आणि माजी उपसरपंच सुरेश नाथा आव्हाड यांच्या संकल्पनेतून राजकारण विरहीत हा उपक्रम राबविण्यात आला. वडुले खुर्द येथील माजी सैनिक, निव्रुत्त शिक्षक, डॉक्टर, वकील, चेरमन,नगराध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सहकार क्षेत्रातील मान्यवर संचालक, राजकीय नेते, स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी/विद्यार्थीनींना या सन्मान सोहळ्यात मानाची ट्राँफी देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मुरलीधर दगडू आव्हाड हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पाथर्डी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि या गावचे भुमिपुत्र अभयकाका आव्हाड हे होते. या गावाने हा सन्मान सोहळा साजरा करत जिल्ह्यात प्रथमच एक आदर्श निर्माण केला आहे. महिला वर्गातील सौ.संजीवनी रणमले,अलका गाडेकर,अलकनंदा आव्हाड, अनिता शिंदे,द्वारकाताई आव्हाड, डॉ. अपुर्वा आव्हाड यांनाही सन्मानित करण्यात आले.माजी कर्नल डॉ सर्जेराव नागरे,तलाठी विष्णु आव्हाड, पाथर्डी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड,तुळशीराम रणमले,सुनिल आव्हाड सर,सतिश आव्हाड सर,नागरे गुरुजी, दिलिप आव्हाड, शेषराव आव्हाड सर,धर्मनाथ आव्हाड सर,अशोक आव्हाड, रमेश आव्हाड, आचवले सर,यांना सन्मानित करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हा सन्मान सोहळा संपन्न झाला.प्रारंभी या भुमिपुत्रांची गावातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरा पासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.अभयकाका आव्हाड यांनी संपूर्ण गाव गट-तट विसरून एकत्र झालेले पाहून समाधान व्यक्त केले. आणि गावच्या विकासासाठी तुम्ही मला हाक द्या तुमच्या साठी मी सदैव साथ देईल असे सांगितले.या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कामासाठी बाहेर असलेले भुमिपुत्र,आणि पंचक्रोशीतील अनेक मांन्यवर आवर्जून उपस्थित होते. प्रिती भोजनाने या सोहळ्याची सांगता झाली. (प्रतिनिधी, सुनिल नजन, अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here