शिर्डीच्या बिरोबा बनातील भविष्य वाणी “राज्याच्या राजकारणात प्रचंड ढवळाढवळ होईल”

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर )
संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी येथील बिरोबा बनातील भक्त हरीभाऊ हेमा बनकर यांनी बिरोबा यात्रेत(होईक) भविष्य वाणी सांगितली ती पुढील प्रमाणे- पुढील वर्षी काही ठिकाणी म्रुग नक्षत्रात चांगला पाउस होईल.तर काही ठिकाणी आर्द्रा आणि कौरात पेरणी होईल. पुढचा पुढे जाईल आणि मागचा मागे राहील. रानचाळ होईल. काही ठिकाणी भयंकर राढा होईल. पोलीस प्रत्यक्ष डोळ्यानी पाहून कानानी ऐकतील. माय लेकरांना डोळ्याआड होताच काही ठिकाणी पिडा होईल. काही ठिकाणी जमिन नापिक होईल, तर काही ठिकाणी हारळ उगवेल. काही ठिकाणी रक्ताचा पूर वाहील,आणि महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड प्रमाणात ढवळाढवळ होईल अशी भविष्य वाणी शिर्डीच्या बिरोबा बनात वर्तविण्यात आली. रात्री नउ वाजता सुरू झालेले वाद्यकाम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होते. या कार्यक्रमासाठी, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे,अहमदनगर दक्षिण मधिल भाजपचे खासदार सुजयदादा विखे,मीरीचे भगत सिताराम भगत,आसाराम भगत,आबू भगत,दत्तू भगत,भाउसाहेब तोगे, आवर्जून उपस्थित होते.शिर्डीचे बिरोबा भक्त रतीलाल लोढा काका, मनोज लोढा, महेश लोढा,यांच्या वतीने आलेल्या भाविकासाठी दोन दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बिरोबा बन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चांगदेव भगत,साहेबराव काटकर,बाळासाहेब काटकर, नानासाहेब बनकर, राजाभाऊ वाघ,रावसाहेब बनकर, चिमाजी बनकर शंकर बनकर,भाउसाहेब काटकर, जयराम कांडळकर, सोपानराव बनकर, चंद्रभान बनकर, नवनाथ बनकर, प्रकाश बनकर, गवा वाघ,आणि सालकरी रंभूतात्या बनकर यांनी विषेश परिश्रम घेतले.संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीतील लोककलेचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या धनगर समाजाच्या वतीने आप आपल्या भागात असलेल्या पारंपारिक पद्धतीच्या लोककलेचे या महोत्सवात दर्शन घडले. धनगरी न्रुत्य, ओव्या, वाण,वह्या, लंगर उपटणे,काठीने अंगावर वार घेणे,भंडाऱ्याची उधळण करत हा महोत्सव साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी सुनिल नजन,अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here