
सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) :-लम्पी आजारामुळे केळगाव येथील एका जनावराचा सोमवारी मृत्यू झाला.यामुळे शेतक-याचे नुकसान झाले.केळगाव येथील शेतकरी प्रवीण काशिनाथ ज्ञाने यांच्या बैलाला चार ते पाच दिवसांपासून लम्पीची बाधा झाली होती.उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.पशुधन पर्यवेक्षक डॉ एस.आर.महाकाळ यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.रब्बी हंगामाच्या तोंडावर बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी प्रवीण ज्ञाने हे संकटात सापडले आहेत.त्यांना मदत देण्याची मागणी बाळासाहेब ईवरे , दत्तू मख ग्रा.पं सदस्य , विठ्ठल राठोड, रमेश गायकवाड, विनोद हिंगमिरे.आदीचे केली आहे.
