
सिल्लोड-प्रतिनिधी विनोद हिंगमिरे
सिल्लोड तालूक्यातील केळगांव लघुप्रकल्पात सद्या शंभर टक्के पाणी पातळी आहे.
या प्रकल्पातुन अंभईसह पांच गावाना पाणीपुरवठा केला जातो.मात्र लघुप्रकल्पाच्या भिंतींवर दोन्ही बाजुने विविध प्रकाराच्या झाडेझुडपाची झपाट्याने वाढ झाल्याने व झाडेझुडपाची मुळ्या भिंतीमध्ये खोलवर पसल्यामुळे हे झाडेझुडपे लवकर न काढल्यास भिंतींला तडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.पाण्यात मोठ्या प्रमाणात बेशरमाचे विषारी झाडे तरंगत असल्याचे दिसत असुन
याकडे संबंधित विभागाचे अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे.विशेष बाब म्हणजे झाडेझुडपे लहान असतानाच संबंधित विभागाकडून नियोजन करून झाडेझुडपाची विल्हेवाट लावायला पाहिजे होती.परंतु असे न करता दुर्लक्ष केल्याने सद्या प्रकल्पाच्या भिंतीला झाडेझुडपानी पुर्णत वेडा घातला आहे.यामुळे प्रकल्प खालील शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्वरित हे झाडेझुडपे काढुन विल्हेवाट लावावी अशी मागणी
शेतकऱ्यांकडून जोर धरत आहेत.
