
नाशिक जिल्ह्यात आज क्रिशा फाऊंडेशन (दिंडोरी) आयोजित “कर्मयोगिनी पुरस्कार” केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी श्री. प्रमोद शेठ देशमुख मा. नगराध्यक्ष, श्री.नरेंद्रजी जाधव युवा नेते, श्री शाम मुरकुटे,सौ. उज्ज्वला ताई उगले ,श्री.लक्ष्मणराव गायकवाड तालुकाध्यक्ष,श्री.चंद्रकांत राजे,श्री. तुषार वाघमारे, श्री अमर राजे, सौ मंगला शिंदे,PI वाघ साहेब व इतर मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
