वडुलेखुर्द येथे विरभद्र यात्रा महोत्सव साजरा!

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील तुतारे वस्ती परीसरातील विरभद्र मंदिरात यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला. विरभद्र देवाला गंगेच्या पाण्याणे महाअभिषेक, , छबिना मिरवणूक, ओवी गायन,वाणवह्या, डफाच्या तालावर पारंपरिक धनगरी न्रुत्य सादर करण्यात आले.बिरोबा भक्त एकनाथ खाटेकर यांच्या वाणीतून (होईक) आगामी वर्षातील शेती विषयक पाउस पाण्याविषयी भविष्यवाणी वर्तविण्यात आली. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. यावेळी विरभद्र देवस्थानच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील अनेक राजकीय
नेत्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक प्राध्यापक किसनराव चव्हाण, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष बापुसाहेब पाटेकर,वाघोली सोसायटीचे विद्यमान चेरमन शेषराव आव्हाड सर,अरगडे भाउसाहेब, गोरक्षनाथ जमधडे,देविदास पाटेकर, गणेश कराड, वाघोलीच्या वै.यादवबाबा देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक रमेश दातीर,बाळासाहेब आव्हाड,दातीर सर यांचा समावेश होता. या सोहळ्यासाठी मीरी पंचक्रोशीतील प्रसिद्ध बिरोबा भक्त सिताराम भगत,आसाराम भगत,आबू वीर,रखमाजी वीर, बुटे पाटील,बनसुडे भगत,मारुती तुतारे,सुरेश आव्हाड, उमेश भालसिंग,महादेव मिसाळ,अरुण मतकर आणि संपूर्ण तुतारे परिवारातील सर्व भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.आभार महादेव तुतारे यांनी मानले. प्रतिनिधी सुनिल नजन,अहमदनगर जिल्हा, स्पेशल क्राईम रिपोर्टर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here