हक्काच्या पगारासाठी शिक्षक आझाद मैदानात उपोषण

0

सिल्लोड/औरंगाबाद (प्रतिनिधी विनोद हिंगमिरे )देश घडवायचा असेल तर राष्ट्र प्रथम भूमिकेत शिक्षक हे सर्वप्रथम येतात. देश घडवण्यात ज्यांनी जीवाचे रान केले त्याच शिक्षकांच्या नशिबी पगाराविना जगण्याचे दिवस समाजाला पाहायला मिळत असतील तर देशाची वाटचाल चुकीच्या मार्गाने चालू आहे असे म्हंटल्यास अतिशयोक्ती ठरु नये असे दाहक वास्तव शिक्षण आंदोलनाच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई येथे पाहताना दिसून येत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे 18-18 वर्ष विनापगारी प्रमानिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांच्या नशिबी हक्काच्या अनुदानासाठी भिकेच्या भूमिकेत राहण्याची वेळ आली आहे. या मुळे मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या देखील शिक्षक खचत असल्याचे दिसून येत आहे. माझ्या विद्यार्थ्यांचे यश हेच माझे समाधान मानत आज ना उद्या मला पगार चालू होईल या अपेक्षेने शिक्षक बांधवांचे वर्ष न वर्ष निघून जात आहेत शिक्षक म्हणून अंगाला नीटनेटका कपडा नाही तर आयुष्यभराची जमा पुंजी ही तर दुरचीच गोष्ट म्हणावी लागेल.दाम करी काम ही प्रसिद्ध म्हण देखील येथे यत्किंचितही लागू पडू नये इतकी दुरवस्था या विनाअनुदानित शिक्षकांची झाली आहे. या मुळे घर, कुटुंब, आई वडील, मुले यांच्याही माफक अपेक्षा पूर्णत्वास जाऊ नये. अशा प्रकारच्या मानसिकतेत तो वावरताना दिसत आहे. या या पवित्र पेशा स्वीकारणाऱ्या शिक्षकांची मानसिकता शिकवण्याची तरी कशी राहणार हा यक्ष प्रश्न समोर आ वासून उभे राहिल्याचे या आंदोलनाला भेट दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल.सरकारच्या घोषित, अघोषित, त्रुटी ,विनाअनुदानित ,कायम विनाअनुदानित अशा मायावी शब्द खेळांनी त्यास पूर्णपणे हैराण केले असून या मुळे कित्येक शिक्षक पगाराविनाच निवृत्त झाले असून बरेचसे शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे असून अजूनही त्यांना हक्काच्या वेतनाची अपेक्षा आहे.आंदोलनाच्या ठिकाणचे वास्तव अंगावर काटा आणणारे असून ऊन, वारा, परतीचा पाऊस, अस्वच्छ पिण्याचे पाणी, कुचंबणा करणारी अस्वच्छ शौचालये, जमीन अंथरून तर आकाश पांघरून मानून मागील 20 दिवसांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत हजारोंच्या संख्येने शिक्षक आझाद मैदानात जमा झालेले आहे.जिल्हा परिषद शाळेत,संस्थेच्या मराठी शाळेत गरिबांचे मुले शिकतात परंतू कळत न कळत या सरकारन गरिब मुलांना शीक्षण देणाऱ्या शाळाच बंद पाडन्याचा घाट घातल्याचा आरोप होतोय.अनेक शिक्षक निवृत्त, तरी बोजा वाढतोय,शासनाची ओरड आहेत् की, अनुदान दिल्यास तिजोरीवर बोजा वाढतोय. परंतू दर वर्षी अनेक शिक्षक निवृत्त होताय त्या जागी नवीन भरती नाहीत. मग वाचणारे पैसे जातात कोठे ? असा प्रश्न पुढे येत आहेत.सत्ताधारी चर्चेलाहीं तयार नाही
साठ ते सत्तर हजार शिक्षकांचा हा प्रश्न आदलून बदलून दररोज हजारो शिक्षक आंदोलनात सहभागी परंतू १० आक्टोबर पासून सुरु झालेल्या आंदोलनाला सत्ताधारी विचारात घेत नाहीत. शिवसेना फायर ब्रँड जे परखडपने बोलू शकतात असे अंबादास दानवे, सुषमाताई अंधारे, भास्कर जाधव यासह काहीं श्रमजिवी पक्ष संघटना पदाधिकारी भेटी देत आहे.शिक्षक आमदार विक्रम काळे नावाने बोंब — शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी आश्वसने देत वेळ व्यर्थ घालवला असा आरोप शिक्षकवृंद करीत आहेत. अशा पदाधिाऱ्यांची कुनी बाजू घेतली तर त्यांना तेथें बोलू दिले जात नसल्याचे चित्र बघायला मिळत आहेत.कुणी आई मुलाचा पगार चालू व्हावा, कुणी बायका पतीचा पगार चालू व्हावा तर कुणी मुले आई बापाचा पगार चालू व्हावा म्हणून आंदोलनात सहभागी आहेत.पूर्वी शिक्षक म्हंटले की सर्व अलबेल अशी ख्याती होती परंतू स्वतः शिक्षक व त्यांचे कुटुंब निकृष्ट दर्जाचे जीवन जगत आहेत. ही बाब चिंता व्यक्त करणारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here