ऐन दिवाळीच्या तोंडावर मुडैक्ष्वर बस बंद

0

सिल्लोड (प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) केळगाव मुर्डेश्वर येथील मुक्कामी येत असलेली बस कुठलीही पूर्व सूचना न देता आगाराने बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून बस बंद करण्याचे कारण समजू शकले नाही .
केळगाव येथील सरपंच लताबाई अशोक वाघमोडे यांना जाब विचारला असता मला काही माहीत नाही म्हणून त्यांनी हात वर केले व उडवाउडवी चे उत्तर दिले. व मुर्डेश्वर देवस्थान हे तालुक्याचे आराध्य दैवत असून येथे येणार्या जाणाऱ्या भाविकांची बस बंद असल्यामुळे उडत असुन गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रात्री मुक्कामी येणाऱ्या भाविकांना मुर्डेश्वर न येता आमठाणा येथे थांबावे लागलेले आहे
ऐन दिवाळीचा सण तोंडावर आला असून महिला व बालकांची परेशानी होत असून खाजगी वाहनाने दुप्पट भाडे देऊन आर्थिक लूट होत आहे ज्या दिवशी कृषिमंत्री अब्दुल सत्तर साहेब यांचा केळगाव येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ झाला त्या दिवशीपासून बस बंद करण्यात आली. संभाजी ब्रिगेड सिल्लोड तालुका अध्यक्ष तथा सोसायटी चेअरमन केळगाव विजय पवार व त्यांचे कार्यकर्ते यांनी सिल्लोड आगाराची बस दोन दिवसात चालू न झाल्यास सिल्लोड आगार येथे निवेदन देऊन उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच निष्क्रिय असलेले केळगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत व अधिकारी यांनासुद्धा उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे.
मुर्डेश्वर संस्थांचे पीठाधीश स्वामी सर्वानंदजी महाराज यांनी भाविकांची हेळसांड होऊ नये म्हणून सिल्लोड आग्रास मुक्कामी बस चालू करण्याचे आवाहन केलेले आहे. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, गंगाधर कोल्हे ,दत्तू मुळे भीमा डाखोरकर , मनोज जाधव योगेश शिंदे, दीपक ज्ञाने ,सोमनाथ पा. मुळे ,बंटी मुळे विश्वनाथ शिंदे फौजी सांडू चव्हाण, धिरसिंग पवार आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here