
सिल्लोड 🙁 प्रतिनिधी विनोद हिंगमिरे ) केळगाव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघडकीस आला असून पाणी पुरवठा विभागाने गावात पाणी सोडण्यासाठी सुद्धा पक्षपात करण्यात येत आहे. गावात पाण्याच्या नळासाठी मोठे-मोठे खड्डे खोदण्यात आलेले असून त्यात पानिसाचून गटाराचे घाण पाणी नळाद्वारे नागरीकराना घाण पाणी नळाला येते, दुर्गंधीत पाणी नागरिकांना येते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायत सरपंच लताबाई वाघमोडे ग्रामसेवक एम.ई.अवसरमोल या कडे दुर्लक्ष करीत आहे. विठ्ठल मंदिर ते गावच्या वेशीपर्यंत नळाला पाणीच येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केलेली आहे. यात केसरबाई कोल्हे,रमेश कोल्हे(अपंग),जगदीश कोल्हे,विनायक कोल्हे,संतोष डाखोरकर,विनायक सनान्से,पंडित कोल्ह,तसेच संभाजी ब्रिगेड ता.अध्यक्ष विजय पवार,तातेराव कोल्हे,श्रीराम कोल्हे,शिवशंकर ज्ञाने,विजय कोल्हे,सोमनाथ जनार्धन कोल्हे,प्रकाश कोल्हे,एकनाथ कोल्हे,दिगंबर कोल्हे आदीसह ग्रामस्थांनी तक्रार केली.
