
अहमदनगर : ( सुनिल नजन/अहमदनगर) भर ओल्या पावसात नव्याने बदलून आलेले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना मुकादमाने उसतोडणी कामगाराला साखळदंडाने बांधून ठेवून बांबूच्या काठीने आणि बैलगाडीच्या बैलाच्या जोत्याने मारहाण करीत जीवे मारून करंजी घाटात खोल दरीत फेकून देऊन खुन करत पुरावा नष्ट करून नविन पोलीस अधीक्षक साहेब यांना एक प्रकारे सलामीच दिली आहे. ओला साहेब हे नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अधिक्षक म्हणून कार्यरत होते, या पुर्वी त्यांनी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून ही काम केले होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील खडांबे येथील संजय काशिनाथ माळी (वय ४५) या उसतोडणी कामगाराने उसतोडणी साठी पंढरपूर येथील एका साखर कारखान्या कडून मुकादमा मार्फत आगाऊ रक्कम उचल म्हणून घेतली होती. राज्यातील सर्व कारखाने सुरू झाले आहेत. परंतु उसतोडणी साठी काही कामगार मात्र हे दिवाळी नंतर जाणार आहेत. पण कारखाना मुकादम भागिनाथ धोंडीबा पांढरमीसे रा.मोहोज देवढे ता.पाथर्डी,जि.नगर आणि अशोक जाधव रा.मराठवाडी ता.आष्टी जिल्हा बीड या दोघांनी खडांबे ता.राहुरी जि.अ.नगर येथे जाउन चारचाकी वाहनांच्या सहाय्याने काही उसतोडणी कामगारांना बळजबरीने वाहनात बसवून आष्टी तालुक्यातील मराठवाडी-हरेवाडी शिवारातील एका खोलीत विना अन्नपाण्या वाचून साखळदंडाने बांधून डांबून ठेवत बांबूच्या काठीने, गाडीच्या जोत्याच्या बेल्टने जीव जाईपर्यंत अमानुष मारहाण केली. आणि मयता कडील टीव्हिएस मोटारसायकल गाडी ताब्यात घेऊन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संजय काशिनाथ माळी यास पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात खोल दरीत फेकून दिले. आणि इतर कामगारांना उसतोडणी साठी पंढरपूर येथे घेऊन गेले. करंजी घाटातील मयत कोण आहे हा पाथर्डी पोलिसांनी तपास केला संजय काशिनाथ माळी रा खडांबे ता.राहुरी जिल्हा नगर हा असल्याचे निष्पन्न झाले. या बाबद पाथर्डी पोलीस स्टेशनला भागिनाथ धोंडीबा पांढरमिसे,रा.मोहोज देवढे,ता.पाथर्डी, आणि अशोक जाधव रा.मराठवाडी ता.आष्टी जिल्हा बीड यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ९९१/२०२२ भा.द.वि. कलम ३०२,२०१,३४२, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे, स.पो.नि.पाटील साहेब, पोलिस हेड काँन्स्टेबल अरविंद चव्हाण,पो.काँ. सतिश खोमणे यांनी तातडीने तपास करून खोल दरीतून प्रेत बाहेर काढून पोष्टमार्टेम साठी पाठवून दिले. सदर गुन्हा हा अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असुन प्रेत पाथर्डी हद्दीत टाकले होते या वेळी दोन्ही पोलिस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते. नव्याने आलेले पोलीस अधीक्षक राँकेश ओला हे आपल्या अधिकारात भर ओल्या पावसात या खुनाच्या तपासाची चक्रे किती वेगाने फिरवतात या कडे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नवीन पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, अहमदनगर जिल्ह्यात
(प्रतिनिधी, सुनिल नजन,स्पेशल क्राईम रिपोर्टर, अहमदनगर जिल्हा)
