येवला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. मनविसे मांगणी

0

येवला : येवला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे . हाती आलेले पिक उदा. सोयाबीन, मका, कापूस , भुईमूग, भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . काढणीस आलेले सोयाबीन पिकाला शेतातच मोड आलेले आहे , लागवडी साठी आलेले कांद्याचे रोप जास्त पाऊसमुळे शेतातच सडू लागले आहे .
ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या तोंडचा आलेला घास गेला आहे . शेतकरी राजा पहिलाच कर्जबाजारी असल्याने त्याच्यावर आता परत मोठे संकट ओढवून आले आहे त्यातून शेतकरी राजाला बाहेर काढण्यासाठी सरसगट पंचनामे करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेने चा वतीने नायब तहसिलदार यांचेकडे निवेदन देऊन केली आहे कोणतेही निकष न लावता हेक्टरी ५०,०००/- रू. अनुदान जाहीर करून शेतकऱ्याचा खात्यावर वर्ग करण्याचीही मांगणी यावेळी करण्यात आली येवला तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा असेही निवेदनात नमूद करून नायब तहसीलदार श्रीमंती पंकज मगर मॅङम यांना देण्यात आले आहे
लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निवेदनात म्हटले आहे
यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष महेश लासुरे, जिल्हा उपाध्यक्ष ङाॅ राजेश पटेल, जिल्हा सरचिटणीस रामदास लासुरे,तालुकाध्यक्ष नकुल घागरे,शहरअध्यक्ष गौरव कांबळे,शहर संघटक शैलेश कर्पे, मनविसेचे पदाधिकारी प्रविण खैरनार, सागर खोङके,गोरख खोडके, लखन शिंदे,अक्षय पंङोरे ,निलेश साताळकर, प्रसाद शिनगारे,रोहीत वाघ,आदित्य रंदे, गणेश आहेर,चेतन गायकवाड, आकाश ठोंबरे,शाम शिंदे, विशाल शिंदे,माणिक पवार, कृष्णा पगारे तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांची निवेदनावर सह्या आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here