
नाशिक : केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर कुठलेही निर्बंध घातलेले नाहीत. कांदा निर्यात सुरु आहे, असं केंद्रीयमंत्री भारती पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नाशिक इथे होत्या. नाफेड आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत जनजागृती करावी, असं आवाहन त्यांनी केलं. शेजारी राष्ट्रांची मागणी असेल तर, आपण पुरवठा करतो. मात्र सध्या रशिया- युक्रेन युध्द, श्रीलंकेतील मंदी याचा परिणाम निर्यातीवर होत आहे, असंही त्या म्हणाल्या.
